मनोगत

नमस्कार मंडळी.

"लेखणीतली शाई" या ब्लॉगवर आपलं स्वागत. तुम्हाला माझं लेखन कसं वाटलं ते अवश्य कळवा. आपल्या टाळ्यांचे व टीकांचे मनापासून स्वागत.

आपला,
(ब्लॉगलेखक) प्रशांत

Sunday, November 22, 2009

प्रवास

मजसाठी जेव्हा वाट ही संपणार
मावळेल भास्कर अन् होइल अंधार
सोपस्कार नको मजला काळोखातिल
का खंत करावी कुणी मुक्त झाल्यावर?

मज स्मरा तुम्ही परि थोडक्याच वेळाला
नच अश्रू ढाळा आणिक मज स्मरताना
आठवा प्रेम जे दिले-घेतले आपण
आठवा कधी मजला तुम्ही जाउ द्या पण

हा प्रवास अपुल्या सर्वांना अनिवार्य
एकटेच जाणे पुढे, संपता कार्य
चालला खेळ हा मोठ्या दरबारातिल
जाण्यासाठी स्वगृही एक हे पाउल

एकाकी वाटुन मन होता कधि हळवे
भेटण्या सोयर्‍यासग्यांस तेव्हा जावे
अश्रु सुकवा त्यांच्यात प्रेम वाटून
आठवा कधी मजला तुम्ही जाउ द्या पण


एड्गर अल्बर्ट गेस्ट यांची "मिस मी, बट लेट मी गो" ही कविता काही दिवसांपूर्वी वाचली आणि अनुवाद करण्याचा मोह अनावर झाला. गेस्ट यांची क्षमा मागून या ब्लॉगवर हा स्वैर अनुवाद प्रकाशित करतो.

2 comments:

Anonymous said...

आवडली रे कविता. :)

का खंत करावी कुणी मुक्त झाल्यावर?

आठवा प्रेम जे दिले-घेतले आपण
आठवा कधी, तुम्ही मला जाउ द्या पण

अश्रु सुकवा त्यांच्यात प्रेम वाटून
आठवा कधी, तुम्ही मला जाउ द्या पण

हे खास.

राहुल

Asha Joglekar said...

एकाकी वाटुन मन होता कधि हळवे
भेटण्या सोयर्‍यासग्यांस तेव्हा जावे
अश्रु सुकवा त्यांच्यात प्रेम वाटून
आठवा कधी मजला तुम्ही जाउ द्या पण.
फारच छान पण इतक्यात है असे विचार नको. जीवन रसरसून जगायचंय किती तरी काय काय पहायचय करायचय मग है तर अटळ आहेच.