भाग १:
------
प्रचंड गारठा...... चक्क शून्यावर घसरलाय पारा......!
बर्फ़च घेऊन जणु बाहेर वाहतोय सुसाट वारा !
सूर्यकिरणांनी चकाकतोय दवबिंदू... की पारा?
निसर्गाने उघडलाय बघ! सौंदर्याचा गाभारा....
माझ्या हातात तुझा हात उबदार जरा...
तुझ्यासवे चालत चालत सरावा जन्म सारा....
प्रचंड गारठा...... चक्क शून्यावर घसरलाय पारा......!
तुझ्यासह घालवलेला क्षण अन् क्षण न्यारा....!
------
भाग २:
------
प्रचंड गारठा...... चक्क शून्यावर घसरलाय पारा......!
पहाटे पहाटे पेपरवाल्याने बेल वाजवली कराकरा..
आज रविवार! पुन्हा दुलई ओढून साखरझोप घ्यावी जरा.

सकाळी सकाळी "ही" का आवरतेय आज घरातला पसारा?
मिळेल का आज अंथरुणातच गरमागरम चहा जरा?
"अहो, उठा! .... इतका आळस नाही बरा."
प्रचंड गारठा...... चक्क शून्यावर घसरलाय पारा...... !
आता उठा राव लवकर.. चढण्याआधी "हिचा" पारा.....!!
5 comments:
प्रचंड गारठा...... चक्क शून्यावर घसरलाय पारा...... !
कॉमेंट लिहिताना हात कापतोय थराथरा!!!
अनिरुद्ध, क्या बात है!
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
Mast kavita aahe...
lai bhari!!!
पारा तर हल्ली ४० च्या जवळपास पोचतोय . पण गारठ्या ची मजा आली कविते मुळे . मस्तच .
Post a Comment