मनोगत

नमस्कार मंडळी.

"लेखणीतली शाई" या ब्लॉगवर आपलं स्वागत. तुम्हाला माझं लेखन कसं वाटलं ते अवश्य कळवा. आपल्या टाळ्यांचे व टीकांचे मनापासून स्वागत.

आपला,
(ब्लॉगलेखक) प्रशांत

Thursday, September 30, 2010

तुझ्या-माझ्यात

शांतता हवेत
शांतता नभात
अशा रम्य वेळी
आणि तुझी साथ

आकाश निरभ्र
रात्र चांदण्याची
अन् तुझा चेहरा
आभा चंद्रमाची

एक हास्य तुझे
गालावर खळी
मिटता पापणी
गुलाब-पाकळी

मंद वाहे वारा
हवेत गारवा
आणि तुझा स्पर्श
सुगंधी मरवा

तू माझ्या मनात
मी तुझ्या मनात
आणि तुझे माझे
हातांमध्ये हात

4 comments:

माऊ said...

मस्त !!!

placid78 said...

छान जुळुन आली आहे कविता!!!

आशा जोगळेकर said...

तू माझ्या मनात
मी तुझ्या मनात
आणि तुझे माझे
हातांमध्ये हात
वा मस्त जमलीय ही प्रेम कविता .

shashankk said...

प्रशांत नमस्कार ,
मी शशांक पुरंदरे - पुणेकर. खूप वर्षांपूर्वी उ. फैयाज़ खान साहेबांच्या एका गुरुपौर्णिमा उत्सवात तुझे violeen वादन ऐकले होते . माझी मुलगी -ईश्वरी देखील खां साहेबांकडे शिकत होती -vocal .
तुझ्या कविता सुन्दर आहेत व् ब्लॉग ही वाचनीय आहे . मी पण थोड्या फार कविता करतो - तुला शक्य होईल तेंव्हा पहा .
shashankpurandare.blogspot.com
pshank13@gmail.com