मनोगत

नमस्कार मंडळी.

"लेखणीतली शाई" या ब्लॉगवर आपलं स्वागत. तुम्हाला माझं लेखन कसं वाटलं ते अवश्य कळवा. आपल्या टाळ्यांचे व टीकांचे मनापासून स्वागत.

आपला,
(ब्लॉगलेखक) प्रशांत

Saturday, December 20, 2008

नजर (२)

ओतप्रोत ओसंडतो
जगीचा झगमगाट;
त्यावर भाळे नजर
धरे ऐहिकाची वाट.

प्रतिष्ठित असे कुणी,
तैसे कुणी उपेक्षित;
होमकुंडी हव्यासाच्या
ज्वाला अखंड तेवत.

जुगार खेळी नजर
वासना विखारलेली;
शील लीलावात गेले
अपमानित पांचाली.

वासनेच्या त्या विखारी
आशाळभूत नजरा;
येई भोवळ जीवाला
पाहुनी त्यांचा पसारा.

एक हक्काचा आसरा
शोधीतसे ती नजर;
परी हिरमोड होई
चाले सर्वत्र बाजार.

जाई थकुन नजर
नजरांच्या नजरांनी;
"आयुष्याची ही लक्तरे"
म्हणे, "सांभाळे का कोणी?" (२)

3 comments:

Asha Joglekar said...

आहे खरं नजरा असतांत किती वेगवेगळ्या ।
पण एक मायेची नजर पण असते एक प्रेमाची पण अन एक निख्खळ मैत्री ची ।

Dk said...

wow!!

माझा खो फिरून प्रशांतला :)

Dk said...

प्रशांत,
नेमका ख़ो कोणत्या ख़ेळाबद्दल >>>
पु. शि. रेग्यांची 'त्रिधा राधा' आणि पेशव्याची ही कविता... वाचली! संवेदने सुरू केलेल्या उपक्रमानुसार कुणाकडूनही खो न घेता स्वतःच घेतलाय! :) अन् अजून नियम नाहीत >>> चा आधार घेउन सरूवात राष्ट्रभाषेतून केल्ये (चु. भू. द्या. घ्या.!)

ब्लॉगवरील संबंधित पोस्ट >> ही लिंक : http://aschkaahitri.blogspot.com/


दीप.


सपनो से भरे नैना... ना नींद है ना चैना :)