मनोगत

नमस्कार मंडळी.

"लेखणीतली शाई" या ब्लॉगवर आपलं स्वागत. तुम्हाला माझं लेखन कसं वाटलं ते अवश्य कळवा. आपल्या टाळ्यांचे व टीकांचे मनापासून स्वागत.

आपला,
(ब्लॉगलेखक) प्रशांत

Thursday, May 27, 2010

रेशिमगाठी

दारांमधल्या भिंती आणिक भिंतींमधली दारे
लपंडाव हा सुखदुःखाचा व्यापे जीवन सारे

गावामधले रस्ते आणिक रस्त्यांलागत गावे
कुठवर चालावे थांबावे कधी, कुणाला ठावे?

शब्दांमधले अंतर आणिक अंतरातले शब्द
अवचित येती, मना स्पर्शिती अन् करती निःशब्द

नात्यांमधले प्रेम अलौकिक अन् प्रेमाची नाती
नात्यांच्या गुंत्यात हरवल्या नाजुक रेशिमगाठी

3 comments:

Rahul said...

Nice poetry, very smartly written!!!

Asha Joglekar said...

शब्दांमधले अंतर आणिक अंतरातले शब्द
अवचित येती, मना स्पर्शिती अन् करती निःशब्द
वा, फारच मस्त .

mau said...

नात्यांमधले प्रेम अलौकिक अन् प्रेमाची नाती
नात्यांच्या गुंत्यात हरवल्या नाजुक रेशिमगाठी...
फारच सुंदर...खुप मस्त लिहीलेत..