मनोगत

नमस्कार मंडळी.

"लेखणीतली शाई" या ब्लॉगवर आपलं स्वागत. तुम्हाला माझं लेखन कसं वाटलं ते अवश्य कळवा. आपल्या टाळ्यांचे व टीकांचे मनापासून स्वागत.

आपला,
(ब्लॉगलेखक) प्रशांत

Friday, July 4, 2008

वर्गात एक होती

ऑर्कुटवर मित्रांशी गप्पा मारताना एकदा विडंबनाचा विषय निघाला तेव्हा गदिमांच्या "एका तळ्यात होती बदके पिले सुरेख" या कवितेवर उत्स्फूर्तपणे विडंबन सुचलं. गदिमांची क्षमा मागून ते विडंबन इथे देत आहे.

वर्गामध्येच होती मुलगी सुरेख एक
होते तरूण वेडे मागे तिच्याच कैक

कोणी तिच्याच स्वप्नी दिनरात नित्य रंगे
स्पर्धा कधी ती होता मित्रांत होती दंगे
"व्हावी ती फक्त माझी", सर्वांचं ध्येय एक
होते तरूण वेडे मागे तिच्याच कैक

कोणी न व्यक्त करती प्रणयास तिच्यापाशी
सरसावता वदाया संकोचती मनाशी
दिन आणि मास सरले आले जसे कितीक
होते तरूण वेडे मागे तिच्याच कैक

एके दिनी परंतू तिजलाच ते म्हणाले
तुजवरी प्रेम अमुचे तुज ना कसे कळाले?
ती बोलली तयांना थांबूनिया क्षणैक
मज न्यावयास आला "तो" राजहंस एक

10 comments:

Unknown said...

Hi Prashant...

very inetresting effort !!!
mi ani aai ni aatta kavita wachli..ti sadhya blore la aaliye..
introducing her to blog vishwa.. :)

best wishes...

hmayee

Anand R. Joshi said...

fantabulous , simply excellent. keep it up.

छायाचित्रण said...

Mastach aahe re he viDamban...
wah..varga madhech hoti mulagi surekh....mhanje prashant...baher shodhyalach nako re...kalpanach chhan aahe.....
Lihit raha re...kharach chhan lihitos....Dil kasa garden garden jhala re....

सौ. प्रतिमा उदय मनोहर said...

तुझी नवी कविता छान लिहिली आहेस.

आई

प्रशांत said...

हिरणमयी,
आश्चर्याचा सुखद धक्का दिलास! अभिप्रायाबद्दल thank you very much!
Anand,
Thank you very much for your feedback.


Milind,
;)


आई,
मी कळवायच्या आत कविता पाहिलीस आणि अभिप्रायसुद्धा दिलास! खूप आनंद झाला तुझा अभिप्राय आलेला पाहून.

आशा जोगळेकर said...

प्रशांत, छान जमलीय कविता. गेला महिना सव्वा महिना एव्हझा धावपळीत गेला. सारखा प्रवास. ३-४ दिवस एका ठिकाणी राहिलं कि परत चंबू गवाळं आटपून चालले. आमही सात जणं सर्वांची साठी उलटून गेलेली असे फिरत होतो ह्यांतच अलास्काची डूर पण झाली. केंव्हा ब्लॉग वर जाईन असं झालं होतं. त्यामुळे च शब्द-बंध साठी लिहिता आलं नाही.आता परत केंव्हा ई-सभा ? मागची सभा मला खूप मनमुराद enjoy करता आली नाही. दुसरी कडे होते ना पण तरी ही मजा आली. जर पूर्ण report मिळाला तर आवडेल.

Saee said...

ekdam khuskhusheet ahe vidamban...mulachya kavitetale shevatacha `dhakka tantra` pan vyavasthit sadhala ahe...
mastach...

प्रशांत said...

आशाताई, सई,

अभिप्रायांबद्दल आभार.

विजयकुमार देशपांडे said...

surekha kavita vidamban !

Rahul Apte said...

Nice one!