माघ महिन्यात शुक्लपक्षातल्या चतूर्थीला गणेशजयंती साजरी करतात. गणेशजयंतीसाठी चतूर्थी माध्यन्हकालव्यापिनी असावी असं कृ.वि. सोमण यांनी सुलभ ज्योतिषशास्त्र या ग्रंथात म्हटलं आहे. दोन दिवस चतूर्थी असून दोन्ही दिवशी संपूर्ण किंवा अंशतः माध्यन्हकालव्यापिनी असल्यास पहिल्या दिवशी, दोनपैकी एकाच दिवशी (पूर्णतः किंवा अंशतः) माध्यान्हकालव्यापिनी असल्यास त्या दिवशी, व दोन्ही दिवशी माध्यन्हकाळी अजिबात नसल्यास पहिल्या दिवशी गणेशजयंती साजरी करावी असं त्यात म्हटलं आहे. भारतात यंदा गुरुवार दि. २९ रोजी सायंकाळी ६:०१ वाजता चतूर्थी सुरू होते आहे व ती शुक्रवारी (दि. ३०) सायंकाळी ६:३८ वाजेपर्यंत असेल. त्यामुळे भारतात ३० तारखेला गणेशजयंती साजरी होईल. पूर्व अमेरिकेत व पश्चिम अमेरिकेत गुरुवार दि. २९ रोजी अनुक्रमे सकाळी ७:३० व पहाटे ४:३० वाजता चतूर्थी सुरू होत असून ३० तारखेला अनुक्रमे सकाळी ८:०८ व पहाटे ५:०८ वाजेपर्यंत असेल, याचा अर्थ, माध्यान्हकालव्यापिनी चतूर्थी गुरुवार दि. २९ रोजीच आहे, त्यामुळे अमेरिकेमध्ये गुरुवारी गणेशजयंती साजरी होईल.
पंचांग पाहताना आणखी एक गोष्ट ध्यानात आली, की नुकतीच होऊन गेलेली संकष्ट चतूर्थी भारतात बुधवारी होती, परंतु, चंद्रोदयव्यापिनी चतूर्थी अमेरिकेमध्ये मंगळवारी असल्यामुळे ती अंगारकी संकष्ट चतूर्थी होती. त्या चतूर्थीपूर्वी लक्ष्यात न आल्यामुळे ब्लॉगवर प्रकाशित करू शकलो नाही, त्याबद्दल क्षमस्व.
भाग २ चे संदर्भ:
१. श्री. कृ. वि. सोमण - सुलभ ज्योतिषशास्त्र
२. दाते पंचाग (शालिवाहन शक १९३० - सर्वधारीनाम संवत्सर)
३. http://kalnirnay.com/