आठवणींच्या मालिकेत त्यां शोधीतसे हे मन बावरे.
पुत्र कुणाचा, मित्र कुणाचा, बंधू, दीर कुणाचा तो;
सोडुन गेला एकाएकी, जैसा नभी तारा तुटतो.
तत्पर होता मदत कराया, नच ठाऊक त्याला थकणे;
आसपास झळकतसे त्याचे असणे, दिसणे, वावरणे.
दृष्ट लागली कुणाची तरी या लाखातील एकाला,
निर्घृणपणे कोणी केले काळ्या रात्री ठार त्याला.
जन्माला येणार्या जीवां अटळ मरण हे सत्य जरी,
अकाली का ते यावे, देण्या अंध:कार कुणाच्या दारी?
सग्यासोयर्यांमध्ये आता एक जागा सदैव रिक्त;
असणे त्याचे आता राहे त्याच्या आठवणींतच फक्त.
माझा मावसभाऊ, (स्व.) अमोल बुधवार, दि. ६ फेब्रुवारी २००८ रोजी अचानक आम्हा सर्वांना सोडून गेला. त्याच्या अस्तित्वात इतका उत्साह आणि जिवंतपणा होता, की तो आमच्यात नाही हे स्वीकारायला मन तयार होत नाहीये. ईश्वर त्याच्या आत्म्याला शांती देवो आणि मावशी, काका, आजी, अनंत, अक्षय, सौ. योगिनी वहिनी, चि. रुची व चि. अनन्या, तसेच अमोलच्या सर्व आप्तस्वकीयांना धीर देवो.
3 comments:
फारच दुर्दैवी घटना घडली.
ह्या कठिण प्रसंगी आपले व आपल्या नातलगांचे सांत्वन.
आपल्या स्वकीयांचं असं एका एकी जाणं फार दु:ख दायक असतं. तुमच्या मनीचे भाव तुमच्या कवितेत हळुवार पणें व्यक्त होताहेत. तुमच्या दु:खात सहभागी आहे. स्व.अमोल च्या आत्म्याला शांती लाभौ हीच प्रार्थना.
god bless him and may his soul rest in peace.
Post a Comment