मनोगत

नमस्कार मंडळी.

"लेखणीतली शाई" या ब्लॉगवर आपलं स्वागत. तुम्हाला माझं लेखन कसं वाटलं ते अवश्य कळवा. आपल्या टाळ्यांचे व टीकांचे मनापासून स्वागत.

आपला,
(ब्लॉगलेखक) प्रशांत

Monday, August 30, 2010

पाऊस-कविता

"पाऊस" या विषयावर अनेक कवींनी अनेक कविता केल्या असल्या, तरी पाऊस जसा हवाहवासा वाटतो तशा कविताही हव्या हव्याशा वाटतात. दोन-तीन वेळा पावसावर एक-दोन ओळी सुचल्या, पण सलग कविता काही सुचली नाही. :( मग विचार केला, की मराठी ब्लॉगबांधवांची मदत घ्यायला काय हरकत आहे? या पूर्वी "जे जे उत्तम", "आवडलेले थोडे काही", "साखळी हायकू" किंवा अगदी अलिकडच्या "मावसबोलीतल्या कविता" अशा अनेक उपक्रम मराठी ब्लॉगजगतात छानच प्रतिसाद मिळाला. त्यातून असा विचार आला, की पावसावरील कडव्यांची साखळी का करू नये?

तेव्हा, ब्लॉगबंधु-भगिनींनो, "पाऊस-कविता" पुढे चालवण्यासाठी काही सोपे नियम -

१. शक्यतो छंदबद्ध कडवे तयार करू. अगदीच नाही जमलं तर मुक्तछंद चालेल. पण प्रयत्न करायला काय हरकत आहे? कविता गुंफ़ायची असल्यामुळे आधीचा कडव्याशी थोडासा तरी संबंध असावा.

२. छंदाचं नाव माहिती असल्यास ते कळवावे. त्याबद्दल माहिती दिली तर छानच. अर्थात नाही दिली तरी चालेल.

३. किमान एक व जास्तीत जास्त चार ब्लॉगबांधवांना खो देता येईल. संबंधित ब्लॉगलेखकास प्रतिसाद देऊन तसे कळवावे.

४. खो मिळाल्यावर ज्याच्या/जिच्याकडून खो मिळाला आहे त्या ब्लॉगलेखकाच्या पोस्टाचा दुवा आपल्या पोस्टात द्यावा व शक्य असल्यास आधीची कडवीही उतरवावीत. तसेच आपण खो स्वीकारल्यावर त्या पोस्टाचा दुवा खो देणाऱ्या पोस्टाच्या प्रतिसादात कळवावा, जेणेकरून आधीच्या लोकांनाही नोंद ठेवता येईल.

५. हे नियम सर्वांच्या सोयीसाठी डकवावे.

६. बस्स. आणखी काही नियम नाही. :-) आता फक्त पाऊस-कविता....

मग करायची‌ सुरुवात?

माझं कडवं - (भुजंगप्रयात छंद)

न क्रोधी असा पावसा रे सख्या रे
तुझी वाट पाहे सखी मी तुझी रे
झणी येउनी वर्ष रे थेंब थेंब
तुझा स्पर्श अंगा करो चिंब चिंब


माझा खो -चक्रपाणि, क्रांती, गायत्री, सेन मन यांना

5 comments:

क्रांति said...

न क्रोधी असा पावसा रे सख्या रे
तुझी वाट पाहे सखी मी तुझी रे
झणी येउनी वर्ष रे थेंब थेंब
तुझा स्पर्श अंगा करो चिंब चिंब

याला माझं उत्तर घे प्रशांत
छंद तोच, भुजंगप्रयात

खुळ्या पावसाला किती आवरू रे?
सरी श्रावणाच्या कशा पांघरू रे?
निळे सावळे मेघ येती छळाया,
सख्या, दूर तू, मी कशी सावरू रे?

माझा खो प्राजु, राघव, गोळे काका, जयवी यांना







माझा खो - राघव, क्रांती, आशाताई, अ सेन मन यांना

Asha Joglekar said...

Prashant, aajach pahila blog an hee paoos sakhli kaeita disali. Mala gole kakani kho dila tyanch tushar ch an maz kadaw tula sangtey.
नको पावसा कोसळू तू असा रे
किती घोर लावून जाशी असा रे
पुरे जाहले, ने पुढे सर्व वारे
जरा राजसा थांब आता कसा रे

क्रांतीच्या ब्लॉगवरचा मूळ दुवा
.तुषार चे उत्तर छंद भुजंग प्रयात्

कुणी पावसाला म्हणे येत जारे
कुणाला सरीने सजण आठवे रे
कुणी गातसे पावसा थांब आता
अशी पावसाची अनोखीच गाथा

माझा खो सई, चैताली, अनुराधा आणि शब्दसखा यांना.

माझे उत्तर. छंद तोच भुजंग प्रयात

सख्या पावसा तू असा रे कसा रे
तुला साथ देती हे उन्मत्त वारे
कधी ध्वस्त करशी जगाचा पसारा
कधी वर्षसी अमृताच्याच धारा ।

माझा खो चैताली आणि महक ला

Asha Joglekar said...

प्रशांत कसा आहेस । गणपती च्या निमित्तानी ये ब्लॉग वर ।

Kamini Phadnis Kembhavi said...

नमस्कार प्रशांत, तुम्ही सुरु केलेल्या पाऊसकवितांच्या साखळीमध्ये मी एक कडवं ओवायचा प्रयत्न केला आहे.

http://kavadasaa.blogspot.com/

Kamini Phadnis Kembhavi said...

माझा खो वर्षाला http://varshanair.blogspot.com/
आणि यशोधराला http://sanvaad.blogspot.com/