मनोगत

नमस्कार मंडळी.

"लेखणीतली शाई" या ब्लॉगवर आपलं स्वागत. तुम्हाला माझं लेखन कसं वाटलं ते अवश्य कळवा. आपल्या टाळ्यांचे व टीकांचे मनापासून स्वागत.

आपला,
(ब्लॉगलेखक) प्रशांत

Saturday, July 31, 2010

शुभं करोति

जाहली सांज
दिवेलागण होई
घराघरांत

नंदादीपाचा
देव्हाऱ्यात पडला
मंद प्रकाश

दारात लक्ष्मी
सोनपावली येते
आशिष देते

देव्हाऱ्यातली
सांजवात म्हणते
शुभं करोति

4 comments:

Asha Joglekar said...

सुरेख आहेत त्रिवेणी ।

Rahul said...

छान!!!

Dhananjaya jog said...

धनंजय जोग, बंगलोर
०९८८६६९६८६२

किंचितसा बदल- if u don't mind-

जाहली सांज
दिवेलागण होई
घरोघरी

नन्दादीपाने
अवघा देव्हारा जाई
उजळोनी

दारात लक्ष्मी
येई सोनपाऊली
आशीष देई

(last stanza ok.)

Best wishes,
drj

प्रशांत said...

अभिप्रायांबद्दल धन्यवाद.

@धनंजय जोग,
जरा उशीराचं पाहिला तुमचा अभिप्राय.
पण असो. क्या बात है! तुम्ही सुचवलेला बदल एक स्वतंत्र कविता म्हणून आवडला.
पण माझ्या कवितेत प्रत्येक कडवं "५,७,५" अशा तीन ओळींनी बनवलं असल्यामुळे जाणीवपूर्वक तशी शब्दरचना केली आहे.