
"नको लाजवु बदकास राजहंसा
पुरे आता लटकी तुझी प्रशंसा
दैवयोगे तू हंस जाहलासी
मित्र बदकाला परी विसरलासी
लाभली तुजला मान डौलदार
मानसी तूझा त्यामुळे विहार
रसिकजन ते भाळले मानसाला
राजहंसाचा होय बोलबाला."
राजहंसाला बदक वदे ऐसे
हंसमन ते जाहले हरवलेसे
आठवे त्याते बाल्य लोपलेले
कुरूपाला तै लोक हासलेले
मित्र बदकाला राजहंस बोले,
"स्मृती बाल्यातिल आठवू नको रे
जरी मैत्री दृढ आपुली असे रे
भेटता दोघां यातना किती रे!
कटू बाल्यावर सोडिले जळासी
रसिकजन मी रिझविले मानसासी
जाणतो मी, लटकी असे प्रशंसा
मानसास्तव पाहती राजहंसा
जोवरी माझी डौलदार मान
तोवरी माझा मानसात मान
लोपता हे सौंदर्य विसरतील
बदकरूपाते कोण भाळतील?
क्षणिक प्रेमाला मला चाखु दे रे
असे मिथ्या जरि, सौख्य भोगु दे रे
तयानंतर मानसास त्यागून
तुझ्या दारी शेवटी विसावेन."
6 comments:
Excellent, this should be worth publishing. Keep it up!!!
Khoopach chhan kavita aahe. Atishay aawadali. "Eka Talyat Hoti..." cha pudhacha bhag ahe na?
मस्तच झाली रे... अप्रतिम
दोन मनांची आंदोलने छान मांडली गेली आहेत.
प्रत्येक मन आपापल्या जागी योग्य वाटते आहे.
सुंदर...ग्रेट
एका तळ्यात होती.... चा उत्तरार्ध :) मस्तच जमलंय !!
apratim! 'tuzya dari visaven' ... hech antim satya.
जयश्री सारखंच मलाही वाटतंय, कविता झकास जमलीय .
Post a Comment