मनोगत

नमस्कार मंडळी.

"लेखणीतली शाई" या ब्लॉगवर आपलं स्वागत. तुम्हाला माझं लेखन कसं वाटलं ते अवश्य कळवा. आपल्या टाळ्यांचे व टीकांचे मनापासून स्वागत.

आपला,
(ब्लॉगलेखक) प्रशांत

Friday, March 16, 2012

आयुष्य (२)

आयुष्याचे काव्य
असेल निरस
करण्या सुरस
देव स्मरा

आयुष्याची चाल
आडवळणांची
लीला ही देवाची
अप्रमेय

आयुष्याचे चित्र
गूढ नी अमूर्त
कोण साकारित
देवावीण?

देवाने घातले
आयुष्यात रंग
तयांमध्ये दंग
जीव झाला

आंतरजालावरील एका चिरतरुण मित्राला अर्पण. तो मित्र कोण, हे जालावरील चाणाक्ष लोकांनी ओळखले असेलच. :-)

6 comments:

Anonymous said...

आयुष्याचे काव्य
आहे सुरस
आणखी रस आणण्यासाठी
करा अर्पण देवाला !

Yeshwant Karnik said...

अतिशय आवडले.
यशवंत कर्णिक.

प्रमोद देव said...

डोक्यात चाल कधीची तयार आहे पण नरड्यातून बाहेर पडत नाहीये. :(

प्रशांत said...

काका, लवकर बरे व्हा आणि चार-पाच चाली तरी लावा.
आपला,
(जाली मित्र ;) ) प्रशांत

आशा जोगळेकर said...

आयुष्याचे चित्र
गूढ नी अमूर्त
कोण साकारित
देवावीण?

छानच ।

Rahul said...

Good imagination!!!