मनोगत

नमस्कार मंडळी.

"लेखणीतली शाई" या ब्लॉगवर आपलं स्वागत. तुम्हाला माझं लेखन कसं वाटलं ते अवश्य कळवा. आपल्या टाळ्यांचे व टीकांचे मनापासून स्वागत.

आपला,
(ब्लॉगलेखक) प्रशांत

Wednesday, March 14, 2007

सूर्यरथाचा श्लोक

या ब्लॉगमध्ये पूर्वी 'वाहनयोग' या माझ्या लेखात सूर्यरथाचा उल्लेख केला होता, त्यावेळी मला आजोबांनी शिकवलेला श्लोक आठवला नव्हता. काल बाबांनी तो लेख वाचला आणि तो श्लोक मला सांगितला -
-----
रथस्यैकं चक्रं भुजगयमिता सप्तसुरग: ।
निरालम्बो मार्ग: चरणविकल: सारथिरपि ।
रविर्गच्छत्यन्तं प्रतिदिनमपारस्य नभसः ।
क्रियासिद्धिर्सत्वे भवति महतां नौपकरणे ।।
-----
अर्थ:
सूर्याच्या रथाला एक चाक सात आंधळे घोडे आहेत व सारथी पांगळा आहे. असं असूनही आकाशातलं अमर्याद अंतर खंड न करता सूर्यदेव दररोज पार करतात. तात्पर्य, कसोटीला उतरल्यामुळे थोर माणसांची कार्ये तडीस जातात, उपकरणांमुळे नव्हे!

-----



8 comments:

कोहम said...

chaan shlok aahe...thanks for sharing

प्रशांत said...

नमस्कार,
तुमच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

Anonymous said...

Mi Parikshit Anil Soman
parikshit_soman@yahoo.com

Mala kavita vachaychi khup aavd aahe.
Tumchi hi site mala khup aavdli. Mala tumchi "Tu" hi kavita khup aavdli.
All the best.

प्रशांत said...

नमस्कार परिक्षित,
माझी "तू" ही कविता आणि Blog आपल्याला आवडले हे ऐकून आनंद झाला. धन्यवाद.

नरेंद्र गोळे said...

प्रशांत, यावरून मला खालील सूर्यस्तुती आठवली.

श्रीसूर्यस्तुति

जयाच्या रथा एकची चक्र पाहीं।
नसे भूमी आकाश आधार काहीं।
असे सारथी पांगुळा ज्या रथासी।
नमस्कार त्या सूर्यनारायणासी।।1।।

करी पद्म माथां किरीटी झळाळी।
प्रभा कुंडलांची शरीरा निराळी।।
पाहा रश्मी ज्याची त्रिलोकासी कैसी।
नमस्कार त्या सूर्य. ।।2।।

सहस्त्रद्वये दोनशे आणि दोन।
क्रमी योजने जो निमिषार्धतेन।
मना कल्पनेनं जयाच्या त्वरेसी।
नमस्कार त्या सूर्य. ।।3।।

विधीवेध कर्मासि आधार कर्ता।
स्वधाकार स्वाहाही सर्वत्र भोक्ता।
असे अन्नदातां समस्तां जनांसीं।
नमस्कार त्या सूर्य.।।4।।

युगे मंत्र कल्पांत ज्याचेनि होती।
हरिब्रह्मरूद्रादी त्या बोल‍िजेती।
क्षयांतीं महाकाळरूप प्रकाशी।
नमस्कार त्या सूर्य. ।।5।।

शशी तारका गोवुनी जो ग्रहांते।
त्वरें मेरू वैष्टोनियां पूर्वपंथें।
भ्रमे जो सदा लोक रक्षावयासी।
नमस्कार त्या सूर्य. ।।6।।

समस्तांसुरांमाजि तूं जाण चर्या।
म्हणोनीच तू श्रेष्ठ त्यानाम सूर्या।
दुजा देव तो दाखवी स्वप्रकाशीं।
नमस्कार त्या सूर्य.।।7।।

महामोह तो अंधकारासी नाशी।
प्रभा शुद्ध सत्त्वाची अज्ञान नाशी।
अनाथा कृपा जोकरी नित्य ऐशी।
नमस्कार त्या सूर्य.।।8।।

कृपा ज्यावरी होय त्या भास्कराची।
न पाहू शके शत्रु त्याला विरंची।
उभ्या राहती सिद्धी होऊनि दासी।
नमस्कार त्या सूर्य. ।।9।।

फळे चंदनें आणि पुष्पे करोनी।
पुजावें वरें एकनिष्ठा धरोनी।
मनी इच्छिले पाविजे त्या सुखासी।
नमस्कार त्या सूर्य. ।।10।।

नमस्कार साष्टांग बापा स्वभावें।
करोनी तया भास्करलागीं ध्वावें।
दरिद्रें सहस्त्रादि जो क्लेश नाशी।
नमस्कार त्या सूर्य. ।।11।।

वरी सूर्य आदित्य मित्रादी भानू।
विवस्वान इत्यादीही पादरेणू।
सदा वांछिती पूज्य ते शंकरासी।
नमस्कार त्या सूर्यनारायणासी ।।12।।

प्रशांत said...

नरेंद्रकाका,
या माहितीबद्दल मनापासून आभार. सूर्यस्तुती छानच आहे. समर्थ रामदासस्वामींची रचना आहे का ही?

Unknown said...

कृपया सुर्यस्तुतीवर विवेचन करावें.यातील दृस्तांत स्पष्ट करावें ही विनंति

Heramb Patil said...

Please also read my blog on global peace. childreninglobalpeace.blogspot.in