लेखणीतली शाई रसिका तुझ्याचसाठी
विचारसुमनांची ही मालिका तुझ्याचसाठी
नभोमंडली अखंड फिरती ग्रहनक्षत्रे
पुनवेचे हे टिपुर चांदणे तुझ्याचसाठी
ग्रीष्मातिल तव तृषार्त आणिक शिणलेले मन
प्रसन्न करण्या वाहे सरिता तुझ्याचसाठी
अहर्निश जरी कष्ट जीवनी असतिल मोठे
आनंदाचे मौल्यवान क्षण तुझ्याचसाठी
शब्द नव्हे, हे अमृत विधिच्या कमलदलातिल
श्रींच्या इच्छेने अवतरले तुझ्याचसाठी
3 comments:
प्रशांत,
तुमचा तसेच तुमच्या आईच ब्लॉग छान आहे.
तुम्ही व्हायोलिनही वाजवता हे वाचून छान वाटलं. तुमचं कुटुंबच प्रतिभावंत कलाकारांच आहे म्हणायच!
शुभेच्छा!
आपका blog छान आहे. आवडला.
sangeetagod व harekrishnaji (नाव माहित नसल्यामुळे blognameनेच संबोधित करीत आहे.),
तुमच्या प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. मी तुमचे blogs नियमितपणे वाचतो. तुमचे blogs फारच उत्कृष्ठ आहेत.
Post a Comment