मनोगत

नमस्कार मंडळी.

"लेखणीतली शाई" या ब्लॉगवर आपलं स्वागत. तुम्हाला माझं लेखन कसं वाटलं ते अवश्य कळवा. आपल्या टाळ्यांचे व टीकांचे मनापासून स्वागत.

आपला,
(ब्लॉगलेखक) प्रशांत

Wednesday, June 6, 2007

वर्षेची चाहूल
मोराने फुलविला पिसारा आज पुन्हा
वर्षेची चाहूल लागली आज पुन्हा

शीतल वारा ऐक सांगतो अवनीला
सुगंध मातीचा दरवळला आज पुन्हा

लपंडाव का सूर्याची किरणे करती?
सरतील का घन बरसल्याविना आज पुन्हा?

पाहिलीस का सुंदर नक्षी आकाशी?
निळे-केशरी रंग पसरले आज पुन्हा

कालच झाली ओळख आपुली स्वप्नात
सांग तू मला भेटशील का आज पुन्हा?1 comment:

shortcircuit said...

वाह वा श्रावणसंध्येची आठवण करून दिलीस!