मनोगत

नमस्कार मंडळी.

"लेखणीतली शाई" या ब्लॉगवर आपलं स्वागत. तुम्हाला माझं लेखन कसं वाटलं ते अवश्य कळवा. आपल्या टाळ्यांचे व टीकांचे मनापासून स्वागत.

आपला,
(ब्लॉगलेखक) प्रशांत

Tuesday, March 25, 2008

बर्‍याच दिसांनी

बर्‍याच दिसांनी तानपुर्‍यातुन
उमटला आज स्वयंभू गंधार
बर्‍याच दिसांनी प्रसन्न मनाने
आराधना केली साधावया सूर

बर्‍याच दिसांनी अनुभवले की
सकाळी पडले आज लख्ख ऊन
बर्‍याच दिसांनी थंडी ती विरली
आणि झाले वसंताचे आगमन

बर्‍याच दिसांनी आस्वाद घेऊन
यथेच्छ जेवलो सुग्रास भोजन
बर्‍याच दिसांनी आज लोचनांनी
घेतले जगाचे सौंदर्य टिपून

बर्‍याच दिसांनी होऊन बेभान
नाच नाचलो मी रंगात रंगून
बर्‍याच दिसांनी आनंदाचे डोही
नाहले होऊनी दंग आज मन

5 comments:

Asha Joglekar said...

ब-याच दिसांनी झाले ब्लॉग वर आगमन
अन् काय रम्य घडले दर्शन

प्रशांत said...

क्या बात है आशाजी!
काव्यात्मक अभिप्रायाबद्दल धन्यवाद.

विनायक पंडित said...

प्रिय प्रशांत उदय मनोहर
माझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्द्ल आभार!
आपल्या प्रतिक्रियेबद्दल मन:पूर्वक आभार!
आपल्या ब्लॉगला भेट दिली.आपल्याजवळ अनेक उत्तमोत्तम कौशल्यांचा संगम झालाय आणि ती सगळी कौशल्यं आणि आपले इंटरेस्टस आपण जागते ठेवले आहेत.शास्त्रीय संगीत, कविता,संशोधन या सर्वच क्षेत्रात आपण सहज लिहू शकता आहात.आपण जरूर सतत वेळात वेळ काढून लिहायला पाहिजे.मीही नियमित आपल्या ब्लॉगला भेट देईन.
आभार!
आपला मित्र
विनायक पंडित

प्रशांत said...

विनाकयराव,
अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

क्रांति said...

सुन्दर!