मनोगत

नमस्कार मंडळी.

"लेखणीतली शाई" या ब्लॉगवर आपलं स्वागत. तुम्हाला माझं लेखन कसं वाटलं ते अवश्य कळवा. आपल्या टाळ्यांचे व टीकांचे मनापासून स्वागत.

आपला,
(ब्लॉगलेखक) प्रशांत

Wednesday, April 8, 2009

लोपला स्वयंभू गंधार

तंबोर्‍याची तुटली तार
मैफलीत झाला अंधार
भैरवीविना सभा संपली
निमाला स्वरांचा दरबार
लोपला स्वयंभू गंधार

सुरेल गाणे रंगी रंगले
मंत्रमुग्ध रसिकांना केले
आज अचानक मात्र थांबला
कशास तारांचा झंकार?
लोपला स्वयंभू गंधार

सूर लोपले ताल थांबला
स्थायीतच अंतराही शमला
आलापांचा अन् तानांचा
आज का कुंठला विस्तार?
लोपला स्वयंभू गंधार

1 comment:

Asha Joglekar said...

वा,खूपच सुरेख किंचित दुखाची झालर असलेली ही कविता भावली मनाला पण तुझ्या वयात ?