मनोगत

नमस्कार मंडळी.

"लेखणीतली शाई" या ब्लॉगवर आपलं स्वागत. तुम्हाला माझं लेखन कसं वाटलं ते अवश्य कळवा. आपल्या टाळ्यांचे व टीकांचे मनापासून स्वागत.

आपला,
(ब्लॉगलेखक) प्रशांत

Monday, September 8, 2008

प्रसूतिवेदना... थीसिसच्या

पी.एच्.डी. करताना "थीसिस-लेखन" या महत्त्वाच्या टप्प्यात आलेली व्यक्ती लॅबमध्ये "हाय प्रायर्टी पर्सन" झालेली असते. "थीसिस एकं थीसिस" असं आयुष्य बनलं असताना अशा परिस्थितीत चिडचिड, वैताग, काळजी, अधीरता, इत्यादि भावना उफाळून येत असतात. माझा एक मित्र मध्यंतरी या परिस्थितीतून गेला होता व सध्या ऑर्कुटवरील एक मित्र मास्टर्सच्या प्रोजेक्टचा थीसिस लिहिताना त्याच परिस्थितीतून जातोय. या दोघांशीही गप्पा झाल्या तेव्हा त्यांना "चिंता करू नकोस. इट्स जस्ट अ स्मॉल फ़ेज इन लाईफ़" वगैरे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला तेव्हा माझं थीसिस-लेखन, त्यावेळची माझी झालेली चिडचिड आणि त्याआधीचं माझ्या सीनियर्सचं थीसिस-लेखन आणि त्यांची झालेली चिडचिड, इत्यादि सर्व गोष्टी आठवल्यात आणि हसू आलं. थीसिस-लिहिणार्‍या व्यक्तीची ही परिस्थिती आणि थीसिस सबमिट केलेल्या व्यक्तीच्या जीवनातली "झाले मोकळे आकाश" ही परिस्थिती या सर्वांचं अवलोकन करता थीसिस सबमिशनला "थीसिसची प्रसूति" म्हणायला हरकत नाही असं वाटलं. तर, या थीसिसच्या "प्रसूतिवेदना" सोसणारी व्यक्ती स्वतःशीच स्वतःच्या भावना व्यक्त करतेय अशी कल्पना करून कविता करण्याची इच्छा अनावर झाली. अचानक, कविवर्य मंगेश पाडगांवकरांची कविता आठवली व त्यावर विडंबन केलं - अर्थातच पाडगांवकरांची क्षमा मागून.दिवस माझे हे बोचायचे
प्रसूतिवेदना सोसायचे

कामांना उरकत जाणे
त्यावरी थीसिस लिहिणे
लायब्ररीत रेफ़रन्स चाळायचे
प्रसूतिवेदना सोसायचे

गाठावी लॅबेची खोली
करावी इच्छांची होळी
चार तास फक्त झोपायचे
प्रसूतिवेदना सोसायचे

थरारे मस्तक फार
सोसेना कामांचा भार
बरेच "पापड बेलायचे"
प्रसूतिवेदना सोसायचे

अशा या नाजुक परिस्थितीत काही लोकांचे नाजुक संबंध जुळल्याची उदाहरणंही माझ्या माहितीत आहेत. खालील कडवं त्यांच्यासाठी-

माझ्या या लॅबेच्यापाशी
थांब तू गडे जराशी
तुझ्याच आशेने जगायचे
प्रसूतिवेदना सोसायचे

3 comments:

Chakrapani said...

साखळी हायकू साठी तुला खो दिलाय बघ.

आशा जोगळेकर said...

मस्त. थीसिस सबमिट करतांना होते खरीच अशी अवस्था. अगदी घायकुती ला येतो जीव पण म्हणतात ना. तंतोतंत वर्णन.
ओखली में सिर दिया तो मूसलों से क्या डरना
तर सोसायचं ्सतं ते अन् एकदा सबमिसन झालं कि हुश्श ! निदान वायवा च्या तारखे पर्यंत तरी .

सौ. प्रतिमा उदय मनोहर said...

फ़ारच सुंदर कविता केली
आई , बाबा