मनोगत

नमस्कार मंडळी.

"लेखणीतली शाई" या ब्लॉगवर आपलं स्वागत. तुम्हाला माझं लेखन कसं वाटलं ते अवश्य कळवा. आपल्या टाळ्यांचे व टीकांचे मनापासून स्वागत.

आपला,
(ब्लॉगलेखक) प्रशांत

Sunday, September 28, 2008

लतादीदींना

अंगाई वा प्रेमगीत वा असो ईश्वराचे ध्यान
विरह असो वा गाण्यात असो देशभक्ती महान
अंखंड राहो बरसत तुमच्या गळ्यामधुनिया तान
तृप्त करित राहो संतत ते रसिकश्रोत्यांचे कान
ध्रुवतार्‍यासम अचल "लता" हे संगीतातिल स्थान
शब्दांमध्ये अशक्य कथणे कीर्तीचे महिमान
सदा मिळो नवपिढीस तुमच्या गाण्यातुन प्रेरणा
"जुग जुग जिये लतादीदी" ही ईशचरणी प्रार्थनाआज २८ सप्टेंबर. ज्यांच्या गाण्याने "सुबह चले, शाम ढले" अशी लाखो रसिकांची दैनंदिनी आहे, त्या आपल्या सर्वांच्या लाडक्या गायिका, भारतरत्न, स्वरसम्राज्ञी लतादीदींचा आज वाढदिवस. लतादीदींबद्दल लिहिण्याइतकी माझी योग्यता नाही. त्यांच्या प्रतिभेला साजेसे तोलामोलाचे शब्द सुचत नसले, तरी पण एक रसिक म्हणून मला जे काही सुचलं, ते आदरणीय दीदींना प्रेमपूर्वक अर्पण करतो. त्यांना आयुरारोग्य लाभो व त्यांचा संगीतप्रवास असाच अखंडपणे चालत राहो व रसिकांना मोहिनी घालत राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना.

1 comment: